शाल
| अक्षरभारती | Class 10 |
- प्रियंका चंद्रात्रे
पाठ सारांश
✍️ एकदा लेखक पु. ल. देशपांडे यांच्याकडे कामानिमित्त गेले असता, सुनीताबाई व पु. ल. यांनी शाल दिली. हे लेखकला खूप गौरवास्पद वाटले. त्यांनी ती शाल न वापरता सुटकेसमध्ये ठेवली .
✍️ लेखक वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून गेले होते. त्यांना नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत राहायला दिले होते. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई लेखकाला दिलेल्या खोलीच्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे
बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. लेखकला राहवले नाही. त्यांनी सुटकेसमधील
‘पुलकित’शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले
आणि म्हटले, ‘‘त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.’’ या घटनेची ऊब पुलकित शालीच्या
उबेपेक्षा अधिक होती. म्हणजे , सुनीताबाई व पु. ल. यांनी लेखकला शाल दिली ही त्यांच्यासाठी गौरवास्पद बाब होती पण, तीच शाल एका गरजू मुलाला दिली, त्याची मदत केली हे त्यांच्यासाठी अधिक गौरवास्पद बाब होती.
Visit Our YouTube Channel : Chandratre's Edu Hub
✍️ कविवर्य नारायण सुर्वे अनेक सभा, संमेलने मध्ये भाग घेत असत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांना नेहमी गर्दी राहत असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत असे एकदा ते लेखकाला म्हणाले, ‘‘या शाली घेऊन घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.’’ त्यांचा हा टोमणा लेखकाच्या काय तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारा होता. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर, खरीखुरी शालीनता शालेविनाच शोभते! सुर्वे मुळातच शालीन. शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. लेखक कविवर्यांना म्हणाले ,"शालीमुळे शालीनता येणार असेल तर, मी कर्जबाजारी होईल, भिकेला लागेन; पण शेकडो शाली खरेदी करून सर्वाना एकेक शाल लगेचच नेऊन देईन" यावर शालीन कवि मनापासून हसला.
शालीमुळे शालीनता येते का जाते? याचे लेखकाचे उत्तर ' जाते ' असेच आहे. कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा असतो.
Read More : योगी सर्वकाळ सुखदाता | संतवाणी | Class 10 |
✍️लेखक २00४ साली मराठी साहित्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष झाले. एक-दोन वर्षात त्यांना अनेक शाली मिळाल्या. शालींचे गाठोडे बांधून लेखकाने जवळच्या मित्राला दिले. नंतर लेखकानेच सर्व शाली गरीब श्रमीकांना
वाटल्या.
याच सुमारास लेखक शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसायला आवडत असे. एकदा कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा, अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे लेखकाने पहिले. दुसऱ्या दिवशी लेखकाने दोन शाली त्या म्हाताऱ्याला दिल्या. पुढे चार-पाच दिवस लेखकाला काही कामांमुळे जाणे शक्य झाले नाही. त्यानंतर लेखक नेहमीप्रमाणे ये- जा करत राहिले. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. त्याच्याजवळ गेले असता, तो म्हातारा नेहमीप्रमाणे कुडकुडत होता. लेखकाने त्याला ओळख दिली, शालींची आठवण करून दिली, त्यावर तो भिक्षेकरी म्हणाला, " तुम्ही खूप मोठे आहात, मला शाली दिल्या पण या शाली मला कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची भूक वाईट! मी शाली विकल्या व दोन-तीन दिवस पोटभर जेवलो. आमचं हे असलं वाईट जगणं ! तुझे खूप उपकार आहेत बाबा!
Read More : अंकिला मी दास तुझा | संतवाणी | Class 10 |
✍️ वस्तूची शोभा किंवा मान-सन्मानपेक्षा ( शालीची ऊब ) भुकेलेल्यांच्या पोटाची आग ( अन्नाची ऊब ) शांत करणे जास्त महत्वाचे आहे. गरजूंना अन्नाची मदत करावी आणि शक्य,तर सन्मान म्हणून शाल द्यावी, ही माणुसकीची शिकवण या पाठात दिली आहे.
