शब्दांच्या जाती
- प्रियंका चंद्रात्रे
अ ) खालील वाकयांतील अधोरेखित शब्दांचा नामाचा प्रकार ओळखून लिहा.
१) मीना भित्री मुलगी आहे.
२) आजोबांनी गांधी टोपी घातली.
३) रमेश उदार मित्र आहे.
४) कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे.
५) आईने मोहन ला एक मिटर कापड आणायला सांगितले.
६) मुले चेंडू सोबत खेळत आहेत.
७) पाऊस पडला की गारवा वाटतो.
८) पक्ष्यांचा थवा आकाशात उडत आहे.
९) नेहा उदया अमेरिकेला जाणार आहे.
१०) गुलाबाच्या फुलांचा गुच्छ सुंदर दिसत आहे.
Visit Our YouTube Channel : Chandratre's Edu Hub
आ ) खालील वाकयांतील अधोरेखित शब्दांचा सर्वनामाचा प्रकार ओळखून लिहा.
१) ती वही कोणाची आहे?
२) कोणाला माहीत आहे का ?
३) तुम्ही स्वत:ला काय समजतात?
४) कोणीही बोलणार नाही.
५) जे लिहिण्याचा सराव करतील त्यांचे अक्षर सुधारेल.
६) तुम्हाला काय हवे?
७) आपण सर्व जाऊया.
८) जो बदाम खातो त्याची स्मरणशक्ती चांगली असते.
९) आम्ही उद्या पुण्याला जाणार आहोत.
१०) ह्या पिशवीत काय आहे?
Solve More : Marathi Practice Paper | Grade 7 |
इ ) खालील वाकयांतील अधोरेखित शब्दांचा विशेषणाचा प्रकार ओळखून लिहा.
१) वर्गात चाळीस विद्यार्थी आहेत.
२) काही झाडे वाळली आहेत.
३) ती बोरे आंबट आहेत.
४) रस्त्यावर खूप गाड्या आहेत.
५) माझे शहर स्वच्छ आहे.
६) ससा पांढरा शुभ्र आहे.
७) मी आठवी इयत्तेत आहे.
८) कोणता पक्षी आहे त्या झाडावर?
९) सरला माधुरी पेक्षा उंच आहे.
१०) सर्व रस्ते पावसामुळे खराब झाले.
ई ) खालील वाकयांतील क्रियापद ओळखून लिहा.
१) मी निबंध लिहितो.
२) मोहन पुस्तक वाचतो.
३) रमा भाजी चिरते.
४) केदार नदीत पोहतो.
५) तो आंबा खातो.
६) चांभार चप्पल शिवतो.
७) मी गाणे गातो.
८) आजोबा बागेत फिरतात.
९) बाबा काम करतात.
१०) आई स्वयंपाक करते.
उ) खालील वाकयांतील अधोरेखित शब्दांचा अव्ययाचा प्रकार ओळखून लिहा.
१) साप माझ्या समोरून गेला.
२) पाऊस पडो वा ना पडो, तुला शाळेत जावेच लागेल.
३) त्याच्या कडून हे काम होणार नाही.
४) छे ! मी नाही हं !
५) तू ये किंवा न ये , मी जाणारच.
६) पतंग झाडावर अडकला होता.
७) शिक्षकांनी मुलांना अनेकदा बजावले की मस्ती करू नका.
८) शाबास ! यंदा तू छान मार्क्स मिळवलेत.
९) तू शाळेतून लवकर घरी आलास, म्हणजे आपण खेळायला जाऊ.
१०) कार्यक्रमाविषयी काहीही विचारू नको.
उत्तरे :
अ]
१) भाववचक नाम
२) विशेषनाम
३) भाववचक नाम
४) विशेषनाम
५) पदार्थवाचक नाम
६) सामान्यानाम
७) भाववचक नाम
८) समुहवाचक नाम
९) विशेषनाम
१०) समुहवाचक नाम
आ]
१) दर्शकवाचक सर्वनाम
२) प्रश्नार्थक सर्वनाम
३) आत्मवाचक सर्वनाम
४) अनिश्चित सर्वनाम
५) संबंधी सर्वनाम
६) प्रश्नार्थक सर्वनाम
७) आत्मवाचक सर्वनाम
८) संबंधी सर्वनाम
९) पुरुषवाचक सर्वनाम
१०) दर्शकवाचक सर्वनाम
इ]
१) संख्याविशेषण
२) अनिश्चित संख्याविशेषण
३) गुणविशेषण
४) अनिश्चित संख्याविशेषण
५) सार्वनामिक विशेषण
६) गुणविशेषण
७) संख्याविशेषण
८) सार्वनामिक विशेषण
९) गुणविशेषण
१०) अनिश्चित संख्याविशेषण
ई ]
१) लिहितो - लिहिणे
२) वाचतो - वाचणे
३) चिरते - चिरणे
४) पोहातो - पोहणे
५) खातो - खाणे
६) शिवतो - शिवणे
७) गातो - गाणे
८) फिरतात - फिरणे
९) करतात - करणे
१०) करते - करणे
उ]
१) क्रियाविशेषण अव्यय
२) उभयान्वयी अव्यय
३) शब्दयोगी अव्यय
४) केवलप्रयोगी अव्यय
५) उभयान्वयी अव्यय
६) शब्दयोगी अव्यय
७) क्रियाविशेषण अव्यय
८) केवलप्रयोगी अव्यय
९) उभयान्वयी अव्यय
१०) शब्दयोगी अव्यय
