Advertisement

06 February 2025

मराठी सुलभभारती Class 8 | भाग - २ | Term - II | | गिर्यारोहणाचा अनुभव | झुळूक | आम्ही हवे आहोत का ? | जीवन गाणे | संतवाणी |

                         

                मराठी सुलभभारती Class 8

                                                                                                

                                                                                                  - प्रियंका चंद्रात्रे 


Chandratre's Study Material


👉 खालील प्रश्नांची एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा .

१) ईशानला कसला कंटाळा आला होता ?
उ - व्हिडिओ गेम खेळण्याचा कंटाळा आला होता. 

२) सुट्टी घालवण्याचा पर्याय सापडत नसताना ईशानला दिलासा मिळणारी कोणती घटना घडली?
उ - गिर्यारोहण संस्थेकडून ईशानच्या कॉम्प्युटर वर एक ई -मेल आला. 

३) ईशानला कसला छंद होता ?
उ - ईशानला गिर्यारोहणाचा छंद होता . 

  Visit Our YouTube Channel :  Chandratre's Edu Hub

४) गिर्यारोहण म्हणजे काय ?
उ - गिर्यारोहण म्हणजे ' पर्वत चढणे ' होय.

५) ईशानने गिर्यारोहण संस्थेचा निमंत्रणाचा संदेशाची माहिती कोणाला दिली?
उ - ईशानने आपले मित्र धैर्य, प्रशांत, अमन आणि सक्षम यांना दिली. 

६) ईशान व त्याचे मित्र ऋषिकेशहून उत्तर काशीला कशाने पोहोचले ?
उ - ईशान व त्याचे मित्र ऋषिकेशहून उत्तर काशीला टॅक्सीने पोहोचले.

७) ईशान व त्याच्या साथीदारांनी कशाच्या साहाय्याने गंगोत्रीला जाण्याचा निश्चय केला?
उ - ईशान व त्याच्या साथीदारांनी माऊंटेनिअरिंगच्या  साहाय्याने गंगोत्रीला जाण्याचा निश्चय केला. 

८) लोक स्पुंदून स्पुंदून का रडत होती?
उ - तांडवात आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे लोक स्पुंदून स्पुंदून रडत होती.

९) भुकेने व्याकूळ झालेल्या मुलाने वडिलांकडे कशाची मागणी केली?
उ - भुकेने व्याकूळ झालेल्या मुलाने वडिलांकडे बिस्किटांची मागणी केली. 


१०) दुकानदाराने बिस्किटांचा पुडा आणि पाण्याच्या बाटलीची काय किंमत सांगितली?
उ - दुकानदाराने बिस्किटांचा पुडा शंभर रुपये आणि पाण्याच्या बाटलीची दोनशे रुपये किंमत सांगितली. 

११) घरमालकाने खोलीचे भाडे किती सांगितले?
उ - घरमालकाने खोलीचे भाडे पंधरा हजार रुपये सांगितले. 


१२) ईशान व त्याच्या साथीदारांना रात्र कोठे काढावी लागली?
उ - ईशान व त्याच्या साथीदारांना रात्र पहाडावर नायलॉनच्या तंबूत काढावी लागली.

१३) मुलांना वीरपदक मिळावे म्हणून हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी कोणाकडे शिफारस केली?
उ -  मुलांना वीरपदक मिळावे म्हणून हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींकडे शिफारस केली.

१४) " झुळूक" या कवितेत कवीला काय व्हावेसे वाटते?
उ - कवीला एखादी मंद झुळूक व्हावी असे वाटते. 

१५) कळीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते?
उ - कळीला हळुवारपणे बोट लावावे असे कवीला वाटते. 

१६) दिशा दिशांतून कवी काय उधळून देतो?
उ - दिशा दिशांतून कवी फुलांचा सुगंध उधळून देतो. 

१७) कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे?
उ - कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे. 

१८) झुळूक कोणाच्या मुखावर टवटवी आणणार आहे?
उ - झुळूक दिवसभर जो राबून दमला असेल, त्याच्या मुखावर टवटवी आणणार आहे. 

१९) झुळूक विसावा केव्हा घेईल ?
उ - झुळूक तिन्हीसांजेला विसावा घेईल. 


२०) इस्पितळ कोणत्या भागात आहे?
उ - इस्पितळ मुंबईच्या परळ भागात आहे. 

२१) इस्पितळ कोणाचे आहे ?
उ - इस्पितळ जनवारांचं आहे. 

२२) तसबिरीत कोणत्या जनावरांची चित्रे होती?
उ - तसबिरीत बैल, घोडा, कुत्रा, मंजर, शेळी यांची चित्रे होती. 

२३) चित्राच्या खाली काय लिहिलेले होते?
उ - " आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?" असे लिहिले होते. 

2४) लिखिकेला इस्पितळ कोणी दाखविले ?
उ -  लिखिकेला इस्पितळ भरत नावाच्या चुणचुणीत मुलाने दाखविले. 

2५) लिखिकेने सर्वप्रथम कोणता विभाग बघितला ?
उ - लिखिकेने सर्वप्रथम मांजरांचा विभाग बघितला. 

२६) प्रत्येक मांजरांजवळ काय ठेवल्या होत्या? का?
उ - प्रत्येक मांजरांजवळ दोन बशा ठेवल्या होत्या. एक खाद्यपदार्थासाठी व दुसरी पाण्याची. 

२७) मांजरं समाधानाची पावती कशी देतात ?
उ - मांजरं समाधानाची पावती पोटातून ' गुर्रगुर्र ' आवाज काढून देतात. 

२८) पाठातील मांजरांची नावे लिहा. 
उ - 'जॅक जाधव', ' बकुल गोखले' , 'सॅमी डिकुन्हा ', आणि 'रोमल टिपणीस ' . 

२९) लेखिकेच्या अंगावर कोण झेप घेऊ बघतो?
उ -  लेखिकेच्या अंगावर झेन्या झेप घेऊ बघतो. 

३०) जन्मापासून आंधळी कोण आहे?
उ - जन्मापासून आंधळी मांजर आहे. 

३१) ' जीवन गाणे' या कवितेत कवीला जीवन जगण्याचे कोणी - कोणी शिकवले ?
उ - चंद्र, चांदणे, पणती, नदी , पक्षी, सागर आणि वृक्ष यांनी शिकवले. 

३२) भरकटलेल्या जगात कसली जाण नाही?
उ - भरकटलेल्या जगात सुसंस्कारांची जाण नाही. 

३३) पणत्या कोठे आहेत?
उ - पणत्या तुळशीवर आहेत. 

३४) स्वैर होऊन नदी का पळते ?
उ - सागराला भेटण्यासाठी नदी स्वैर होऊन पळते. 

३५) दुसऱ्यांसाठी घाव कोण सोसतात ?
उ - दुसऱ्यांसाठी घाव वृक्ष सोसतात. 

३६) शब्द कोणास म्हणतात?
उ - ज्या एका अक्षराने किंवा अक्षरसमूहाने एखादी वस्तु, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो, त्या अक्षरास किंवा अक्षरसमूहास 'शब्द' असे म्हणतात. 

३७) 'शब्दसंग्रह' म्हणजे काय?
उ - एखाद्या भाषेचा विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला 'शब्दसंग्रह' असे म्हणतात. 

३८) ' शब्दकोश' म्हणजे काय?
उ - एखाद्या भाषेतील सर्व शब्दांचा संग्रह, विशिष्ट रचनापद्धतीचा अवलंब करून दिल असल्यास त्याला ' शब्दकोश' असे म्हणतात. 

३९) ' अकारविल्हे ' म्हणजे काय?
उ - शब्दकोशात 'अ ' या अक्षरापासून लावलेला क्रम होय. 

४०) संत सेना महाराजांनी आजचा दिवस सोन्यासारखा झाला आहे असे का म्हटले आहे?
उ - संतांच्या दर्शनाने आजचा दिवस सोन्यासारखा झाला आहे असे का म्हटले आहे. 

४१) संत सेना महाराजांना संतांना पाहून कोणासारखा आनंद होतो?
उ - सासरी गेलेल्या मुलीला माहेरी जसा आनंद होतो, तसा संत सेना महाराजांना संतांना पाहून आनंद होतो. 

४२) संत सेना महाराजांचा शीण कशामुळे गेला?
उ - संत सेना महाराजांचा शीण संतांचे चरण पाहून गेला. 

४३) संत सेना महाराजांच्या मते दिवाळी दसरा केव्हा असतो?
उ - संत सेना महाराजांच्या मते दिवाळी दसरा संत घरी आल्यावर असतो. 

४४) संत चोखामेळा यांच्या अभंगात कोणत्या झाडांचा उल्लेख केला आहे?
उ - संत चोखामेळा यांच्या अभंगात बोरी, बाभळी आणि चंदन या झाडांचा उल्लेख केला आहे. 

४५) संत चोखामेळा यांनी संतांना कोणाची उपमा दिली आहे?
उ - संत चोखामेळा यांनी संतांना चंदनाची उपमा दिली आहे. 

४६) संत चोखामेळा कोणाच्या सहवासात परमार्थ साधण्यास सांगत आहे?
उ - संत चोखामेळा संतांच्या सहवासात परमार्थ साधण्यास सांगत आहे.





No comments:

Post a Comment

Things around us | Biotic and abiotic components of the Environment | Living things and their characteristics |

Things Around Us                                                                                                    - Priyanka Chandratre  ...