पुन्हा एकदा
कवयित्री - प्रतिमा इंगोले
| अक्षरभारती | | Class 9 |
- प्रियंका चंद्रात्रे
पुन्हा एकदा
चमकावी वीज
उतरावी खाली
भिनवी रक्तात
पेटवे स्नायू
करीत पुकार
पुन्हा एकवार
कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी निसर्गातील वेगवेगळ्या प्रतिकांचा वापर करून नवीन समाज करण्याचा ध्यास घेतलेल्या मनस्थितीचे वर्णन केले आहे. त्या म्हणतात की, पुन्हा एकदा वीज चमकून खाली यावी. त्या विजेचे तेज, तिची ऊर्जा , प्रखरता माणसांच्या रक्तात भिनावी. म्हणजेच माणसांमध्ये पुन्हा एकदा उत्साह, जोश भरून यावा. त्यांचे स्नायू पेटून उठावेत म्हणजेच समाजात असलेल्या जुन्या, रूढी, परंपरा, अन्याय, अत्याचार, अनिष्ट चालीरीती याविरुद्ध त्यांनी पेटून उठावे, त्यांचा विरोध करावा आणि हे सारे नष्ट करून समाजाला प्रगतीच्या वाटचालीवर नेणारे नवीन विचार निर्माण व्हावेत.
Visit our YouTube channel : Chandratre's Edu Hub
पुन्हा एकदा
घालीत पिंगा
पावसाच्या सरी
व्हाव्यात बेभान
कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक...
पुसून टाकीत भेदाभेद...
पुन्हा एकवेळ...
Read More: उजाड उघडे माळरानही | Class 9 | भावार्थ |
कवयित्री पुढे म्हणतात की, पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी पिंगा घालीत म्हणजे स्वत:भोवती गोल गोल फिरत, स्वत:चे भान विसरून जमिनीवर याव्यात. या बेभान सरींमुळे मातीत माती एक व्हावी म्हणजे समाजातील भेदभाव नष्ट होवून सगळ्यांनी एकत्र यावं. समाजात असलेला गरीब-श्रीमंत, उच्च-नीच , जात- धर्म, स्त्री- पुरुष यांच्यात होणारा भेदभाव संपावा आणि नव्या समाजाची निर्मिती व्हावी ज्यात भेदभाव केला जाणार नाही.
पुन्हा एकदा
घुमावा वारा
युवक इथला
भारला जावा भुलावी
तहान विसरावी भूक
नवनिर्माणाची लागावी
चाहूल उजळावी भूमी... दिगंतात...
पुन्हा एकदा...
Read More : योगी सर्वकाळ सुखदाता | Class 10 | भावार्थ |
कवयित्री म्हणतात की, पुन्हा एकदा नवनिर्मितीचा वारा आपल्या समाजात घुमावा. या वाऱ्याने प्रत्येक युवक भारून जावा. त्याने स्वत: ची तहान भूक विसरून नव निर्माणाचा ध्यास घ्यावा. नवनिर्माणाची चाहूल लागावी. नवीन विचारांचा नवा समाज निर्माण व्हावा. नव्या विचारांनी, नव्या कर्तुत्वाने आपली सारी भूमी उजळून निघावी. म्हणजेच आपली भारतभूमी पुन्हा एकदा नव विचारांना घेऊन पुढे जावी आणि तिची कीर्ती जगभर पसरावी, असे कवयित्रीला वाटते.
.jpg)
