Advertisement

31 January 2025

मराठी सुलभभारती Class 8 | भाग - १ | Term - II | | गिर्यारोहणाचा अनुभव | झुळूक | आम्ही हवे आहोत का ? | जीवन गाणे | संतवाणी |

                 मराठी सुलभभारती Class 8 

                                                                                           
                                                           - प्रियंका चंद्रात्रे 




Chandratre's Study Material




* पाठ / कविता त्यांचे लेखक / कवी :

१ ) गिर्यारोहणाचा अनुभव - रमेश महाले 
२) झुळूक ( कविता ) - दामोदर कारे 
३) आम्ही हवे आहोत का ? - शांता शेळके 
४) जीवन गाणे ( कविता ) - नितीन देशमुख 
५) संतवाणी 
     अ ) संत सेना महाराज 
     आ) संत चोखामेळा 

Visit Our Educational Channel : Chandratre's Edu Hub 


* कोण कोणास म्हणाले ते लिहा : 

१) " बिस्किटांचा एक पूड शंभर रूपयांना मिळेल आणि पाण्याची बाटली दोनशे रूपयांना मिळेल."
उ - दुकानदार भुकेने व्याकूळ झालेल्या मुलाच्या वडीलांना म्हणाला. 

२) " काका , ही तर सरळ लूटमार आहे. "
उ - ईशान व त्याचे साथीदार दुकानदारास म्हणाले. 

३) " मूलांनो, तुम्ही आपले काम करा. येथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात ."
उ - दुकानदार ईशान व त्याच्या साथीदाराना म्हणाला. 

४) " काका, आम्हाला खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी एखादी खोली देऊ शकाल ?"
उ - ईशान व त्याचे साथीदार दुकानदारास म्हणाले. 

५) " हो, परंतु जेवणासाठी दहा हजार आणि खोलीचे भाडे पंधरा हजार रुपये द्यावे लागेल."
उ - दुकानदार ईशान व त्याच्या साथीदाराना म्हणाला. 

६) " परंतु काका, जेवणाची ही किंमत आणि खोलीचे भाडे फार जास्त आहे ."
उ - ईशान दुकानदारास म्हणाला. 

७) " मूला, जीव वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही."
उ - दुकानदार ईशानला म्हणाला. 

८) " बाई , हा मांजरांचा विभाग बघायचाय ?"
उ - भरत लेखिकेला म्हणाला. 

९) " या मांजरांना औषधपाणी माणसांसारख करतात का रे ?"
उ - लेखिका भरतला म्हणाली.

१०) " त्यांच खाणंपिणं पथ्याचं असतं, बाई."
उ -   भरत लेखिकेला म्हणाला. 

११) "इथं आणखी कोणते प्राणी येतात रे? "
उ -  लेखिका भरतला म्हणाली.

१२) " जन्मापासून आंधळी आहे ती !"
उ -  भरत लेखिकेला म्हणाला. 

Solve More : शब्दांच्या जाती 

* खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा. 

१) काळजाला घरे पडणे - प्रचंड दु:ख होणे. 
२) अंगावर काटे येणे - प्रचंड भीती वाटणे. 
३) मनमानी करणे - मनाला वाटेल तसे वागणे. 
४) हैराण होणे - त्रासून जाणे. 
५) कानोसा घेणे - चाहूल घेणे. 
६) पसार होणे - पळून जाणे. 
७) हालवून सोडणे - अस्वस्थ करणे. 
८) कावरेबावरे होणे - गोंधळून जाणे. 
९) अंगावर तुटून पडणे - जोराचा हल्ला करणे. 
१०) घाव सोसणे - दु:ख सोसणे.








No comments:

Post a Comment

Things around us | Biotic and abiotic components of the Environment | Living things and their characteristics |

Things Around Us                                                                                                    - Priyanka Chandratre  ...