Advertisement

18 June 2024

मराठी सराव परीक्षा - १ 

खेळत - खेळत शिकूया   [ Class - 7 ]

पाठ -

सरस्वती स्तवन 

लोटाभर पाणी 

गुण - ३० 


प्र . १ )  खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा . [ 5 Marks ]  

 संभाषण व भाषण यांतील फरक आपल्याला त्या शब्दावरूनच कळतो . संभाषण हे दोन किंवा तीन माणसांचे आपापसंतील बोलणे असते. भाषण हे एखाद्या गटासमोर किंवा मोठ्या समूहासमोर आपल्या विचारांचे प्रकटीकरण असते . आपले विचार समूहाला समजावून सांगणे हे भाषणाचे सर्वसाधारण स्वरूप असते . विचारांची निश्चिती , त्यासाठी प्रमुख मुद्दे , त्यांचा क्रम , उपमुद्दे , त्यांचा परस्परसंबंध , त्यांची तर्कशुद्धी मांडणी करणे आवश्यक असते . आपले मत पटवून देण्यासाठी आधार, प्रमाण , पुरावे यांची आपण मांडणी करतो . आवाजातील चढउतार , शब्दांची निवड, शब्दांचे बिनचूक उच्चार , बोलण्याचा ओघ , आवश्यक तेवढ्याच हालचाली, सर्व समूहाला विश्वासात घेऊन बोलणे ही कौशल्ये आत्मसात करावी  लागतात . भाषेची साधना करणाऱ्याला संभाषण व भाषणाची  कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहेच. 


i ) संभाषण व भाषण यांतील फरक कशावरून कळतो ?

ii ) संभाषण व भाषण यांतील फरक लिहा . 

iii ) भाषणसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात ?

iv ) उत्तम वक्ता होण्यासाठी कोणते कौशल्ये आत्मसात करावी लागतात ?

v ) विरूद्ध शब्द लिहा -

     अनावश्यक -....................                    

     अनिश्चित -........................  

Visit Our YouTube Channel : Chandratre's Edu Hub

प्र .२ ) रिकाम्या जागा भरा . [ 3  Marks ]

i) तू ज्ञानाची .... ............................मूर्ती 

   सदैव प्रकटे ती स्फूर्ती 

   अखंड गावी तुझी .. .. .. .. .. .. 

   हीच तव  पदींची भक्ति 

ii ) ........................ हे  सारे निरखून बघत होते. 

iii ) गांधीजींच्या उत्तराने ................... चमकले .

प्र .३ ) एका वाक्यात उत्तरे लिहा. [ 5  Marks ]

i ) १९१५  साली काय झाले होते ?
ii ) देवीच्या मुखावर काय शोभते ?
iii ) स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेते कोण -कोण होते ?
iv ) देवीकडे किती कला आहेत ?
v ) उधळपट्टी म्हणजे काय?

प्र .४ ) व्याकरण  [ 4  Marks ]

अ ) समानार्थी शब्द लिहा.

i)  चरण -
ii ) जीवन -

आ) विरूद्ध शब्द लिहा.

i ) ज्ञान - 
ii ) न्याय - 

इ ) वचन बदला.

i ) मूर्ती -
ii ) बैठक - 

ई ) लिंग ओळखा.

i ) देवी - 
ii ) नदी - 

प्र .५ ) पुढील प्रश्न सूचनेप्रमाणे सोडवा . [ 4 Marks ]

i )  मंदिर खूप मोठे आहे . ( नाम चा प्रकार ओळखा )
ii ) तो आमचा बंगला आहे. ( सर्वनामचा प्रकार ओळखा )
iii ) रमाने जेवण केले . ( काळ  ओळखा )
iv ) अंक अक्षरात लिहा . 
       ११९ -
       १२७ -

प्र .६ ) खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा .[ 4 Marks ]
i ) सरस्वती देवीचे वर्णन करा . 
ii ) प्रयागला झालेल्या बैठकीचे वर्णन करा .  

प्र. ७ ) कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा . [ 5 Marks ]

i ) माझा आवडता पक्षी 
ii ) माझा आवडता समाजसुधारक 
iii ) महात्मा गांधी 










                       

No comments:

Post a Comment

Things around us | Biotic and abiotic components of the Environment | Living things and their characteristics |

Things Around Us                                                                                                    - Priyanka Chandratre  ...