Advertisement

27 February 2026

Kulup | कुलूप | अक्षरभारती | Class 9 | Kulup lesson summery | पाठ सारांश |

कुलूप 


| अक्षरभारती | Class 9 | 

                                    - प्रियंका चंद्रात्रे 


पाठ सारांश 

✍️ लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर  यांच्या ' सुदाम्याचे पोहे ' या लेखसंग्रहातून हा पाठ घेतला आहे. पाठातील मुख्य पात्र बंडूनाना आहेत, ज्यांना कुलपे संग्रह करण्याचा छंद आहे. 

✍️ बंडूनानांनी आपला छंद पूर्ण करायचा म्हणून, घरात अनेक धातूंची, आकारांची , कळींची कुलुपे जमवून संग्रहालय बनवले आहे.

Visit our YouTube channel : Cahndratre's Edu Hub

✍️ घरात दुधाच्या कपाटापासून ते पैशांच्या तिजोरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी कुलुपे लावलेली आहेत. घरावर डाका पडणार आहे असे कळल्यावर कोणी इतकी तयारी करत नसेल, एवढा बंदोबस्त बंडूनाना करत असे. बंदोबस्त करण्याचे कारण वस्तूंचे रक्षण व्हावे असे नसून, कुलपांचा संग्रह मित्रांना दिसावा असा आहे. या हव्यासामुळेच बंडूनानांनी काही कडयांस दोन-दोन व काही दारांस दोन्ही बाजूंनी कुलपे लावलेली आहेत. 


बंडूनानांचे व्यक्तिमत्व | कुलूप | Class ९ |


✍️बंडूनानांच्या या छंदामुळे अनेक विनोदमय आणि संकटमय प्रसंग आले ते पुढीलप्रमाणे :

१ ) धान्याच्या कोठीचे कुलूप 

एकदा धान्याच्या कोठीच्या कुलपाची किल्ली त्यांच्या कुटुंबाने हरवली. कुलूप वेगळ्या पद्धतीचे  असल्यामुळे संपूर्ण बाजारात किल्ली मिळाली नाही. कुलूप लोहाराकडून काढणे हे बंडूनानांना मान्य नव्हते कारण पोटच्या मुलापेक्षाही प्रेमाने वाढवलेल्या कुलपाची हाडे खिळखिळ होताना पाहणे हे त्यांच्यासाठी वेदनदायी होते. शिवाय बंडूनाना मानी स्वभावाचे, त्यांनी शेजाऱ्यांकडे कधी ओंजळभर धान्यही उसने मागितले नव्हते. पहिला दिवस घरातील सर्व मंडळींनी त्या कुलपानिमित्त कडकडीत उपासात काढला. दुसऱ्या दिवशी द्ववादशी होती, तोही दिवस धार्मिकपणाने उपासात काढला. शेवटी सर्व हकिगत कळताच लेखकाने स्वत: लोहारास घेऊन नानांच्या घरी गेले व ते कुलूप फोडले; पण त्यामुळे नानांना लेखकाचा इतका राग आला, की ते पंधरा दिवसापर्यंत नीटपणे बोलले नाही.


२) ' वसुधैव कुटूंबकम् ' वृत्तीचे कुलूप -  

बंडूनाना सर्व उपयोगातील किल्ल्या आपल्या जानव्यात अडकून ठेवत असे त्यामुळे त्या कधी  हरवत नसे. हरवायच्या त्या कुटुंबातील सदस्यांकडे दिलेल्या किल्या. धान्याच्या कोठीच्या कुलपाच्या प्रसंगामुळे नाना साधी बाजारातील कुलपे कुटुंबाच्या स्वाधीन करू लागले. या कुलपांना कोणतीही किल्ली, खिळा किंवा काडी चालत असे. कधी कधी तर नुसत्या हिसक्यानेच ती उघडत असत. त्यांची अशी ' वसुधैव कुटूंबकम् ' वृत्ती ( सगळे कुलपे एकाच किल्लीने उघडणे ) पाहून शेवटी नानांच्या जवळच्या एका विश्वासू नोकराने हजार पाचशेचे डबोले घेऊन पळाला. 

३) तिजोरीची विविध कुलपे

अ ) अक्षरी कुलूप :

तिजोरीला कोणते कुलूप लावायचे याचा बंडूनानांना फार दिवस प्रश्न पडला होता. प्रथम त्यांनी अक्षरी कुलूप लावले; पण तिजोरी अंधारात असल्यामुळे कुलपाची अक्षरे जमावताना ती नीट दिसेना, म्हणून त्यांनी ती मोठया कष्टाने उजेडात आणून ठेवली. पण तेव्हापासून अक्षरे जुळवताना समोर उभ्या असलेल्या माणसास ती अक्षरे दिसू लागली. त्यामुळे ती कुलपेही निरुपयोगी होती. यापेक्षा अक्षरशत्रू  कुलपे ( अशी कुलपे, ज्यांना उघडण्यासाठी अक्षरे जुळवावी लागत नाहीत, ती फक्त साध्या किल्लीने उघडतात ) असे म्हणून नानांनी त्या कुलपाऐवजी दुसऱ्या कुलपाची योजना केली. 

ब ) अक्षरशत्रू कुलूप : 

हे कुलूप नुसते दाबले की लागत असे. उघडताना मात्र त्याला किल्लीची जरूर लागे. एके दिवशी बंडूनाना लेखकाकडे येऊन म्हणाले " आमच्या आर्यभूमीच्या ( भारताच्या ) पुत्रांना कल्पकता नाही म्हणून चोहोकडे ओरड चालू आहे. पण हा आरोप निव्वळ खोटा आहे. अहो, आम्हाला सांधी मिळत नाही साधी! ती मिळाली तर आमच्याकडे शेकडो एडिसन झाले असते" देशाच्या अभिमानाचा या  उमाळ्याचा अर्थ विचारला असता नानांनी प्रथम आपली कोणत्याही प्रकारे स्तुती करणार नाही असे लेखकाकडून वचन घेतले. हे कुलूप नानांनी स्वत: लोहाराच्या मदतीने बनवून घेतले होते. मात्र थोड्याच दिवसात चोरी झाली, तेव्हा नानांचा संताप झाला व म्हणाले " आमच्याकडे चोरसुद्धा देशबुडवे व कलेला आश्रय न देणारे असतात.!" ( चोर देशाची प्रगती किंवा कला पाहू शकत नाही व कलेचा आदर करू शकत नाही) 

क ) घंटेचे कुलूप : 

शेवटी नानांनी तिजोरिस घंटेचे कुलूप लावले व ती आपल्या निजायच्या खोलीत नेऊन ठेवली. या कुलपास किल्लीचा प्रयोग सुरू होताच घंटा वाजायला लागेल.

४ ) टोळीकडून घेतलेली कुलपे : 

गावात लोकांची एक टोळी आली. त्यांच्याजवळ चाकू, सुऱ्या , कुलपे वगैरे बऱ्याच वस्तु विकण्यासाठी होत्या. त्यांच्याजवळची बहुतेक कुलपे बंडूनानानीच विकत घेतली व घरातील सर्व जुनी कुलपे काढून नवी कुलपे लावली. कर्मधर्मसंयोगाने  [ चांगली कृत्ये  (कर्म ) आणि योग्य समय (धर्म \ नशीब ) यांच्या योगायोगाने जुळून आलेला मिलाफ ] एक नाटकमंडळीही  याच सुमारास गावात आलेली होती. तिचा पहिला प्रयोग 'सुभद्राहरण अथवा चौर्यविपाक ' त्याच दिवशी होता. बंडूनाना कुटूंबातील सर्व सदस्यांना घेऊन नाटकाला गेले. नाटक सकाळी पाच वाजता संपले. घरी येऊन पाहतात तो सर्व पेट्यांची कुलपे जशीच्या तशी असून आतील माल चोरीस गेलेला! तपास केला असता कळाले की टोळीही पळाली होती. यावरून लक्षात आले की, या टोळीने नानांना सर्व कुलपे विकून स्वत:च्याच किल्ल्या लावून माल पळवला. सुदैवाने त्या रात्री बंडूनानांचे कुटुंब त्यांचे न ऐकता आपले सर्व दागिने अंगावर घालून नाटकाला गेले होते, त्यामुळे तेवढे मात्र वाचले. 




कुलपांच्या हव्यासामुळे घडलेले प्रसंग | कुलूप | Class ९ |







24 February 2026

I Love My School | English Poems | Poems For Recitation Competition | Poems |

 Off t

I Love My School








Off to school,
Off to school,
To read and write and play,
To learn new things each day.

Here is School,
Here is School,
Pencils and crayons, scissors and glue,
Erasers and paper and notebooks too.

We love our school,
We love our school,
We write, we sing, we run,
Lovely to have such fun.

  

Visit our YouTube Channel : Chandratre's Edu Hub


22 February 2026

शाल | Class 10 | अक्षरभारती | Shal |

शाल 

| अक्षरभारती | Class  10 |

                                                - प्रियंका चंद्रात्रे 


पाठ सारांश 

✍️ एकदा लेखक पु. ल. देशपांडे यांच्याकडे कामानिमित्त गेले असता, सुनीताबाई व पु. ल. यांनी शाल दिली. हे लेखकला खूप गौरवास्पद वाटले. त्यांनी ती शाल न वापरता सुटकेसमध्ये ठेवली . 

✍️ लेखक वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून गेले होते. त्यांना नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत राहायला दिले होते. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई लेखकाला दिलेल्या खोलीच्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. लेखकला राहवले नाही. त्यांनी सुटकेसमधील ‘पुलकित’शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, ‘‘त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.’’ या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती. म्हणजे , सुनीताबाई व पु. ल. यांनी लेखकला शाल दिली ही त्यांच्यासाठी गौरवास्पद बाब होती पण, तीच शाल एका गरजू मुलाला दिली, त्याची मदत केली हे त्यांच्यासाठी अधिक गौरवास्पद बाब होती. 

Visit Our YouTube Channel : Chandratre's Edu Hub


✍️ कविवर्य नारायण सुर्वे अनेक सभा, संमेलने मध्ये भाग घेत असत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांना नेहमी गर्दी राहत असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत असे  एकदा ते लेखकाला म्हणाले, ‘‘या शाली घेऊन घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.’’ त्यांचा हा टोमणा लेखकाच्या काय तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारा होता. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर, खरीखुरी शालीनता शालेविनाच शोभते! सुर्वे मुळातच शालीन. शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. लेखक कविवर्यांना म्हणाले ,"शालीमुळे शालीनता येणार असेल तर, मी कर्जबाजारी होईल, भिकेला लागेन; पण शेकडो शाली खरेदी करून सर्वाना एकेक शाल लगेचच नेऊन देईन" यावर शालीन कवि मनापासून हसला. 
          शालीमुळे शालीनता येते का जाते? याचे लेखकाचे उत्तर ' जाते ' असेच आहे. कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा असतो. 


✍️लेखक २00४  साली मराठी साहित्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष झाले. एक-दोन वर्षात त्यांना अनेक शाली मिळाल्या. शालींचे गाठोडे बांधून लेखकाने जवळच्या मित्राला दिले. नंतर लेखकानेच सर्व शाली गरीब श्रमीकांना 
वाटल्या. 
     याच सुमारास लेखक शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसायला आवडत असे. एकदा कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा, अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे लेखकाने पहिले. दुसऱ्या दिवशी लेखकाने दोन शाली त्या म्हाताऱ्याला दिल्या. पुढे चार-पाच दिवस लेखकाला काही कामांमुळे जाणे शक्य झाले नाही. त्यानंतर लेखक नेहमीप्रमाणे ये- जा करत राहिले. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. त्याच्याजवळ गेले असता, तो म्हातारा नेहमीप्रमाणे कुडकुडत होता. लेखकाने त्याला ओळख दिली, शालींची आठवण करून दिली, त्यावर तो भिक्षेकरी म्हणाला, " तुम्ही खूप मोठे आहात, मला शाली दिल्या पण या शाली मला कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची भूक वाईट! मी शाली विकल्या व दोन-तीन दिवस पोटभर जेवलो. आमचं हे असलं वाईट जगणं ! तुझे खूप उपकार आहेत बाबा! 


✍️ वस्तूची शोभा किंवा मान-सन्मानपेक्षा ( शालीची ऊब ) भुकेलेल्यांच्या पोटाची आग ( अन्नाची ऊब ) शांत करणे जास्त महत्वाचे आहे. गरजूंना अन्नाची मदत करावी आणि शक्य,तर सन्मान म्हणून शाल द्यावी, ही माणुसकीची शिकवण या पाठात दिली आहे. 



शाल | class 10 | अक्षरभारती |






19 February 2026

माझे शिक्षक व संस्कार | अक्षरभारती | Class 9 | मराठी | पाठ सारांश |

माझे शिक्षक व संस्कार  

| अक्षरभारती  | Class 9 |
                              
                                                  - प्रियंका चंद्रात्रे  

पाठ सारांश 

👉 लेखक गावची शाळा सोडून शिक्षणासाठी औंध ( जि. सातारा ) येथील हायस्कूलमध्ये जाण्याचा विचार करत होते. त्यासाठी त्यांनी शाळेतील शिक्षकाची भेट घेत होते. 

👉 श्री. हणमंतराव देशमुख - गावचेच रहिवासी , इंग्रजी तर्खडकरांचे भाषांतर शिकवले, स्काउट मास्तर, शाळेचे स्काउटपथक पक्क्या पायावर उभारले.

👉 श्री. कात्रे मास्तर - चौथीच्या वर्गात गणित शिकवले, अवघड विषय सोप्पा करून शिकवला, मास्तर अंगाने सडपातळ, दम्याच्या विकाराने  कधी कधी त्रास व्हायचा, लेखकाचे वडील मास्तरांकडे लाकडे फोडायला जायचे. 


👉 श्री. गोळीवडेकर मास्तर - पाचवीत मराठी, इतिहास व भूगोल शिकवायचे, खरे शेतीतज्ञ शिक्षक, शाळेच्या बागा करण्यातच अर्ध लक्ष, लेखकाचा व मास्तरांचा जवळचा परिचय झाला कारण शाळेच्या बागा मुलांच्या मेहनतीने फुलल्या होत्या. 
मास्तर मुलांवर प्रेम करायचे कारण - मुले वयानं लहान पण धडधाकड होती. कष्टाच्या कामाला कणखर. मुले बागेतल्या विहीरीचं पाणी दोन-दोन तास राहाटाने ओढून, बागेतल्या फुलझाडांना, फळझाडांना देत असे. जमीन कुदळ, टिकावाने खांदावयाची, त्याचे वाफे करायचे, बंध घालायचे अशी सगळी कष्टाची कामे करत असे. 

👉 हेडमास्तर श्री. नाईक मास्तर - शिस्तीचे कडे भोक्ते होते त्यामुळे शाळेत दरारा होता, शाळेला चांगलीच शिस्त लावली होती, शाळेची दुसरी घंटा होताच ते हातात  छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत असे त्यामुळे कोणीही उशिरा येत नसे. 
लेखक औंधला  शिकायला जाणार म्हणून योग्य असं मार्गदर्शन केलं. शिस्तीच्या दृष्टीने कसं वागावे, जीवनात आपली प्रगती कशी करून घ्यावी याबाबतीत त्यांनी केलेला हितोपदेश लेखक कधीच विसरू शकणार नाही. 

Visit our YouTube channel : Chandratre's Edu Hub

👉 श्री. रायगावकर, देशपांडे मास्तर -  या शिक्षकांनी लेखकाला संस्कार देऊन ऋणी केलं आहे हे स्पष्ट करणारे खालील प्रसंग :

१) कुस्ती : कुस्तीसारख्या खेळातसुद्धा जातपात मानली जात असे. लेखक निम्न ( कनिष्ट ) जातीचे होते त्यांच्यासाठी वेगळी तालीम होत असे. लेखकाने हंगामात कुस्त्या करून खोबरे, नारळ, रुपया व पटका सुद्धा मिळवले होते. एकदा लेखक बाहेरगावी कुस्त्यांचा फड पाहायला गेले होते. तेथे एका स्थूल मुलाला, ' याला जोड, याला जोड' म्हणून फिरवत होते. दोन राऊंड मारूनही त्याला कुणी जोड उभा राहील नाही. तेव्हा आमच्यातला एक म्हणाला, ' शंकऱ्या उठतोस का? धरतोस का कुस्ती त्या गड्याबरोबर ?'
      लेखक 'हा हा 'म्हणत मैदानात गेले आणि लढत करण्याची तैयारी दर्शवली; पण लेखकाला कुणीतरी ओळखले आणि अडवले. लेखक नाराज होऊन मागे झाले. हा प्रसंग पाहून रायगावकरांनी लेखकाची समजूत घातली. ते म्हणाले, 'अरे, समाज अजून निद्रिस्त आहे. खेळात-मैदानात जात न पाहता कौशल्य पाहावे, हे अजून त्याला नीट समजले नाही. पण एक दिवस असा येईल, की सारे नष्ट होईल. तुम्हालाही खेळात-स्पर्धेत मानाने बोलावले जाईल.'

२) शिमगा -  शिमग्याच्या धुळवडीला लेखकाच्या प्रौढ वर्गात तमाशाचा फड उभा राहिला. त्या दिवशी प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद होता; पण रायगावकर मास्तरांना याची कल्पना नसल्याने ते नेहमीप्रमाणे वर्गाला भेट द्यायला आले. प्रौढ वर्गाच्या कंदिलाच्या प्रकाशात तमाशा चालला होता, हे पाहून रायगावकर चटकन परत फिरले. त्यांना पाहताच लेखक समोर आले आणि मान खाली करून उभे राहिले, ते पाहून मास्तर म्हणाले , " अरे! आज धूलिवंदन! हे चालायचेच !" आणि निघून गेले.  
      मास्तर दुसऱ्या दिवशी लेखकाला म्हणाले, " शंकर! तू हे ध्यानात ठेव. जिथं प्रौढ साक्षरतेचा वर्ग चालतो, तुम्ही अभ्यास करता त्या विदयेच्या मंदिरात तमाशा कसा उभा ..? 
  
                                                                                      लेखक - शंकरराव खरात 


माझे शिक्षक व संस्कार | Class  9 | मराठी | अक्षरभारती |














  

18 February 2026

Yogi sarvkal sukhdata | योगी सर्वकाळ सुखदाता | संतवाणी | अक्षरभारती | Class 10 | भावार्थ |

योगी सर्वकाळ सुखदाता 

 |अक्षरभारती | Class  10 |

- प्रियंका चंद्रात्रे 


जेवीं चंद्रकिरण चकोरांसी । पांखोवा जेवीं पिलियांसी । 
जीवन जैसे कां जीवांसी । तेवीं सर्वांसी मृदुत्व ।। 
जळ वरिवरी क्षाळी मळ । योगिया सबाह्य करी निर्मळ ।
 उदक सुखी करी एक वेळ । योगी सर्वकाळ सुखदाता ।। 
उदकाचें सुख तें किती । सवेंचि क्षणें तृषितें होती । 
योगिया दे स्वानंदतृप्ती । सुखासी विकृती पैं नाही ।। 
उदकाची जे मधुरता । ते रसनेसीचि तत्त्वतां । 
योगियांचे गोडपण पाहतां । होय निवविता सर्वेंद्रियां ।। 
मेघमुखें अध:पतन । उदकाचें देखोनि जाण । 
अध:पातें निवती जन । अन्नदान सकळांसी ।। 
तैसे योगियासी खालुतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें । 
जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्‌धरी ।। 
                             - संत एकनाथ 


                                                 Read More : अंकिला मी दास तुझा



भावार्थ 

  •  योगी सर्वकाळ सुखदाता’ या अभंगात संत श्री एकनाथ यांनी योगी पुरुषाची महानता अत्यंत समर्पक शब्दांत दाखवली आहे.
  • चकोर पक्ष्यासाठी चंद्रकिरण हे त्यांचे जीवन असते. चंद्राची किरणे पिऊन तो जगतो अशी कल्पना आहे. तसेच पक्षिणी आपल्या लहान पिल्लांना पंखाखाली घेते, त्यांना मायेची ऊब देते. पिल्लांना पक्षिणीचे पंख सुरक्षित ठेवतात. पाणी हे पृथ्वीवरील सर्व सजीवांचे जीवन असते. पाण्याशिवाय सजीवांचे जीवन अशक्य आहे. त्याचप्रमाणे योग्यांचे स्थान समाजात असते. ते अत्यंत मृदू, प्रेमळ असतात. सर्वांशी त्यांचे वागणे प्रेमाचे आणि मृदू असते. असा हा योगी पुरुष आपल्या विचारांच्या ज्ञानाच्या पंखाखाली आपणा सर्वांना एकत्र आणतो आणि आपले जीवन सुख समाधानाने भरून टाकतो.
  • योगी‌ ‌पुरुष‌ ‌हा‌ ‌पाण्यापेक्षा‌ ‌श्रेष्ठ‌ ‌कसा‌ ‌आहे,‌ ‌हे‌ ‌सांगताना‌ ‌एकनाथ‌ ‌महाराज‌ ‌पुढे‌ ‌सांगतात‌ ‌की,‌ ‌पाण्याने‌ ‌शरीरावरील‌ ‌मळ‌ ‌धुतला‌ ‌जातो.‌ ‌पाण्याने‌ ‌शरीर‌ ‌वरवर‌ ‌धुतले‌ ‌जाते.‌ ‌कालांतराने‌ ‌शरीर‌ ‌पुन्हा‌ ‌अशुद्ध‌ ‌होते.‌ ‌परंतु‌ ‌योगी‌ ‌पुरुषाच्या‌ ‌सहवासाने‌ ‌शरीर‌ ‌व‌ ‌मनाचीही‌ ‌शुद्धी‌ ‌होते.‌ ‌माणसांतील‌ ‌वाईट‌ ‌विचारांचा‌ ‌नाश‌ ‌होऊन‌ ‌अंतर्बाहय‌ ‌मन‌ ‌निर्मळ‌ ‌होते.‌ ‌पाण्याने‌ ‌होणारी‌ ‌शुद्धी‌ ‌ही‌ ‌क्षणिक,‌ ‌एकावेळेपर्यंत‌ ‌मर्यादित‌ ‌असते.‌ ‌पंरतु,‌ ‌योगी‌ ‌सर्वकाळ‌ ‌सुखदायक‌ ‌असतो.‌ ‌योगी‌ ‌लोकांना‌ ‌शारीरिक‌ ‌आणि‌ ‌मानसिक‌ ‌स्वच्छतेची‌ ‌शिकवण‌ ‌देऊन‌ ‌त्यांचे‌ ‌आयुष्य‌ ‌कायमस्वरूपी‌ ‌उजळून‌ ‌टाकतो.‌ ‌त्याच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌प्रत्येकाला‌ ‌सुख‌ ‌प्राप्त‌ ‌होते.‌
  • पाण्याने मिळणारे सुख‌ ‌हे‌ ‌क्षणिक‌ ‌व‌ ‌मर्यादित‌ ‌आहे.‌ ‌खूप‌ ‌तहानलेल्या‌ ‌माणसाला‌ ‌पाणी‌ ‌प्यायल्याने‌ ‌क्षणभर‌ ‌लगेच‌ ‌समाधान‌ ‌मिळते;‌ ‌पण‌ ‌पुन्हा‌ ‌काही‌ ‌वेळाने‌ ‌तहान‌ ‌लागते.‌ ‌पाण्याने‌ ‌मिळणारी‌ ‌तृप्ती‌ ‌ही‌ ‌क्षणिक‌ ‌असते.‌ ‌परंतु‌ ‌योगी‌ ‌पुरुषांच्या‌ ‌सान्निध्याने‌ ‌स्वानंदतृप्ती‌ ‌लाभते.‌ ‌मनाला‌ ‌एक‌ ‌कायमस्वरूपी‌ ‌सुख‌ ‌समाधान‌ ‌मिळते.‌ ‌जे‌ ‌सुख‌ ‌कमी‌ ‌होत‌ ‌नाही‌ ‌किंवा‌ ‌संपतही‌ ‌नाही‌ ‌असे‌ ‌सुख‌ ‌माणसाला‌ ‌प्राप्त‌ ‌होते.‌ ‌म्हणजेच‌ ‌सुखाला,‌ ‌आनंदाला‌ ‌कसलीच‌ ‌विकृती‌ ‌राहत‌ ‌नाही.‌ ‌याच‌ ‌स्वानंदतृप्तीसाठी‌ ‌प्रत्येकजण‌ ‌धडपडत‌ ‌असतो.‌ ‌योगी‌ ‌पुरुषाच्या‌ ‌सहवासामुळे‌ ‌ही‌ ‌तृप्ती‌ ‌आपणास‌ ‌सहज‌ ‌प्राप्त‌ ‌होते.
  •  पाण्याचा‌ ‌गोडवा‌ ‌केवळ‌ ‌जिभेलाच‌ ‌कळतो.‌ ‌तो‌ ‌जिभेपुरताच‌ ‌मर्यादित‌ ‌असतो.‌ ‌परंतु‌ ‌योग्याच्या‌ ‌सहवासाने‌ ‌लाभलेले‌ ‌माधुर्य‌ ‌मनुष्याच्या‌ ‌सर्वच‌ ‌इंद्रियांना‌ ‌संतुष्ट‌ ‌करते.‌ ‌मनातील‌ ‌कटुता‌ ‌नष्ट‌ ‌होऊन‌ ‌मनाला‌ ‌एक‌ ‌आंतरिक‌ ‌समाधान‌ ‌लाभते.‌ ‌ते‌ ‌चिरकाळ‌ ‌टिकणारे‌ ‌असते.‌
  •  आकाशातील‌ ‌काळ्या‌ ‌ढगांमधून‌ ‌पाण्याच्या‌ ‌धारा‌ ‌धरतीवर‌ ‌बरसतात.‌ ‌त्यामुळे‌ ‌सर्व‌ ‌लोकांना‌ ‌खूप‌ ‌आनंद‌ ‌होतो.‌ ‌सगळे‌ ‌लोक‌ ‌समाधानी‌ ‌होतात.‌ ‌कारण‌ ‌या‌ ‌मेघांतून‌ ‌कोसळणाऱ्या‌ ‌पाण्यामुळे‌ ‌धरतीवर‌ ‌हिरवळ‌ ‌पसरते.‌ ‌त्यातून‌ ‌अन्नधान्याची‌ ‌निर्मिती‌ ‌होते.‌ ‌खायला‌ ‌अन्न‌ ‌व‌ ‌प्यायला‌ ‌पोटभर‌ ‌पाणी‌ ‌मिळाल्याने‌ ‌लोक‌ ‌सुखी–समाधानी‌ ‌होतात.‌
  •  मेघमुखातून‌ ‌धरतीवर‌ ‌येणारे‌ ‌पाणी‌ ‌जसे‌ ‌अन्नधान्याची‌ ‌निर्मिती‌ ‌करून‌ ‌लोकांना‌ ‌सुखी‌ ‌करते.‌ ‌त्याचप्रमाणे‌ ‌योगी‌ ‌पुरुषसुद्धा‌ ‌या‌ ‌इहलोकी‌ ‌जन्म‌ ‌घेतात.‌ ‌स्वर्गलोकातून‌ ‌ते‌ ‌जणू‌ ‌खाली‌ ‌येतात‌ ‌म्हणजेच‌ ‌धरतीवर‌ ‌जन्म‌ ‌घेतात‌ ‌आणि‌ ‌आत्मज्ञान‌ ‌देऊन‌ ‌सामान्य‌ ‌लोकांचा‌ ‌उद्धार‌ ‌करतात,‌ ‌त्यांचे‌ ‌कल्याण‌ ‌करतात.‌ ‌आपल्या‌ ‌भजन‌ ‌कीर्तनातून‌ ‌ज्ञान‌ ‌देऊन‌ ‌ते‌ ‌सर्व‌ ‌लोकांना‌ ‌सदैव‌ ‌सुखी–समाधानी‌ ‌करतात.‌ 

Visit our YouTube Channel : Chandratre's Edu Hub


yogi sarvkal sukhdata | योगी सर्वकाळ सुखदाता | भावार्थ | Class 10 |










 ‌











14 February 2026

संतवाणी | अंकिला मी दास तुझा | अक्षरभारती | Class १० | अंकिला मी दास तुझा अभंग भावार्थ | Ankila mi das tuza class 10 |

 अंकिला मी दास तुझा

                                                                 |अक्षरभारती | Class १०  |
                                                                                                    
                                                                                                        - प्रियंका चंद्रात्रे    

                                         
   

                                                                 अग्निमाजि पडे बाळू । 
माता धांवें कनवाळू ।।१।।
 तैसा धांवें माझिया काजा । 
अंकिला मी दास तुझा ।।२।।
 सवेंचि झेंपावें पक्षिणी । 
पिलीं पडतांचि धरणीं ।।३।। 
भुकेलें वत्सरावें । 
धेनु हुंबरत धांवे ।।४।। 
वणवा लागलासे वनीं । 
पाडस चिंतीत हरणी ।।५।। 
नामा म्हणे मेघा जैसा । 
विनवितो चातक तैसा ।।६।। 

व्यायामाचे महत्त्व | Class 9 | अक्षरभारती | भावार्थ |

व्यायामाचे महत्त्व   कवी - राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर  | अक्षरभारती | Class 9 |                                    ...